तीन महिन्यापुर्वीच कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत ; मिणचेकर फौंडेशनच्या शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मोठी घोषणा
हातकणंगले / सुकुमार अब्दागिरे
हातकणंगले विधानसभा मतदार संघातील जनता माजी आम .डॉ . सुजित मिणचेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याने हातकणंगले विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरणार आहे. तसेच तीन महिन्यापुर्वीच त्यांना कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे माजी मंत्री व शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे नेते भास्करराव जाधव यांनी आज आळते येथील कार्यक्रमात दिले.श्री. क्षेत्र कुंथुगिरी येथे डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशनच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते .पुढे भास्कर जाधव म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने काँग्रेससाठी बराच त्याग केला आहे. विधानसभेच्या जागा वाटपावेळी इकडे तिकडे होऊ शकते . त्यामुळेच डॉ. सुजित मिणचेकर यांनी कामाला लागावे . असे संकेत त्यांना तीन महिन्या पुर्वीच दिले आहेत . त्यांनी या मतदार संघाचे दहा वर्षे नेतृत्व केले आहे . गेल्या निवडणुकीत मित्राने दगा दिल्याने त्यांचा पराभव झाला . चांगली माणसं समाज सेवेसाठी पाठवण्याची गरज असल्याने जनतेने त्यांच्या पाठीशी राहावे . असे आवाहन त्यांनी केलेमाजी आम . डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले , माणसाच्या जीवनात पराभव अंतिम असु शकत नाही . म्हणून परावभवाच्या दुसऱ्या दिवसा पासून काम चालू केले आहे.फौंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेचे कामकाज सुरु आहे . अनेक समाज हिताचे उपक्रम राबवले जात आहेत . कार्यकर्त्यासह शिक्षकांचे पाठबळ पाठिशी आहे यावेळी राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार सन्मानित सागर कुराडे , इंद्रजित कदम , प्रविण यादव , लेखा मिणचेकर , शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांची भाषणे झाली . तानाजी पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पाटील , शिवसेना उपनेते संजय पवार , राज्य संघटक चंगेजखान पठाण, जि .प . माजी सभापती महेश चव्हाण , अस्लम सय्यद , फौंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिणचेकर , विशाल साजणीकर , राकेश खाडे , शशिकांत मिणचेकर , अरविंद खोत , दिपक पाटील , सुरेश मोघे , अभिनंदन सोळांकुरे , सुरेश खोत , प्रसाद पाटील यांच्यासह पुस्कार प्राप्त सर्व शिक्षक , शिक्षिका शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते .