धनगर समाज आज कोल्हापुरात ताकद दाखविणार – अशोकराव कोळेकर

Spread the love

पंढरपुरातील उपोषणास पाठिंबा, आरक्षण मिळण्यासाठी करणार रास्ता रोको

जयसिंगपूर / प्रतिनिधी

धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 14 दिवसापासून पंढरपुरात धनगर समाजबांधव उपोषण करीत आहेत.त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळण्याकरिता आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील धनगर समाज बांधव पक्ष गट तट संघटना बाजूला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवतील असा विश्वास कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे नेते व जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर यांनी व्यक्त केला.
कोंडीग्रे येथील आयडॉल इन्स्टिट्यूटमध्ये इचलकरंजी शिरोळ हातकणंगले तालुक्यातील सकल धनगर समाजाची बैठक पार पडली.यावेळी अशोकराव कोळेकर हे बोलत होते ते पुढे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे काळाची गरज निर्माण झाली आहे.यासाठी राज्यातील समाज बांधव एकत्र येऊन लढा देत आहे.या लढ्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातील रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.
हातकणंगले सकल धनगर समाजाचे नेते कृष्णा पुजारी बोलताना म्हणाले की गेल्या सत्तर वर्षापासूनच्या लढ्याला शासनाकडून केवळ चाल-ढकल केली जात आहे.धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे.आरक्षण मिळवण्यासाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुणे-बेंगलुरू महामार्ग सोमवार 23 सप्टेंबर रोजी आ.गोपींचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.धनगर समाजाचे नेते कल्लाप्पा गावडे म्हणाले की गेल्या 14 दिवसापासून धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर व लातूर येथे आमरण उपोषण सुरू आहे. धनगर समाजाच्या एस.टी. प्रवर्गामध्ये घटनेमध्ये समाविष्ठ आहे.धनगड आणि धनगर, आरक्षणाची ताबडतोब अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याकरीता अनेकवेळा उपोषण आंदोलन करूनही शासन या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत आहे. या प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजाची ताकद दाखवावी असे आवाहन त्यांनी केले
नागेश पुजारी म्हणाले की धनगर समाज जागृत झाला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्रित येण्याची वेळ आली आहे यामुळे पक्ष गट तट संघटना बाजूला ठेवून आरक्षणाच्या लढाईत सर्व समाज बांधवांनी सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातील रास्ता रोकोसाठी शिरोळ हातकणंगले, इचलकरंजीतील धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे .
संदीप हजारे बोलताना म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण मिळावे व उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्याकरिता सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील तावडे हॉटेल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाची पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आली आहे आरक्षण मिळण्याकरिता आता आरपारची लढाई सुरू झाली असून धनगर समाज बांधवांनी पक्ष संघटना बाजूला ठेवून एकत्रित येऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन केले
यावेळी सौ योगिता घुले व सौ अलका पुजारी यांनी धनगर समाजास आरक्षण मिळावे याकरिता सोमवारी कोल्हापुरात होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात समाजातील महिला भगिनींनी सहभागी व्हावे तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी पंढरपुरात धनगर समाजाचा मेळावा होणार आहे या मेळाव्यासही उपस्थित राहण्याचे आवाहन केले
धनगर समाजाचे रामचंद्र सिद्ध डॉ ईश्वर यमगर राजेंद्र कोळेकर जगन्नाथ माने बाबासाहेब सावगावे अविनाश पाटील शंकर पुजारी कुंभार घुबडे निवास पुजारी योगेश पुजारी राजू पुजारी गजानन करे सोमा गावडे संजय पुजारी संपत पुजारी भाऊसो सावगावे आप्पासाहेब हजारे राजेश वाघुरे भाऊसो सावगावे यांनी मनोगत व्यक्त करताना धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी आपले पक्ष संघटना गट तटाचे जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या लढाईत सहभाग घ्यावा आणि कोल्हापुरातील रास्ता रोको आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले
यावेळी शिवाजी म्हैशाळे, दत्तात्रय पुजारी , संजय पुजारी संपत रोवणे राजेश तांबवे तानाजी हराळे, यांच्यासह शिरोळ हातकणंगले इचलकरंजी परिसरातील धनगर समाजाचे नेते पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!