कै.सा.रे.पाटील यांनी आयुष्यभर खरेपणा जपला – अनिलराव यादव

Spread the love

अर्जुनवाड येथे डी के हायस्कूलच्या मैदानाला कै आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील क्रीडांगण असे नामकरण

शिरोळ / प्रतिनिधी

समाजवादी विचारसरणीचे नेते व माजी आमदार कै आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांनी सामाजिक,सहकार क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा अखंडित राहावी यासाठी शाळेच्या मैदानाला त्यांचे नाव देऊन खेळ व खेळाडूंना
चालना दिली जात आहे.सा.रे.पाटील यांनी वैचारिक प्रबोधन करून आयुष्यभर खरेपणा जपला आहे.असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे संचालक व दत्ताजीराव कदम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव यादव यांनी व्यक्त केले.

 

अर्जुनवाड (ता.शिरोळ) येथील दत्ताजीराव कदम तथा डी के हायस्कूलच्या मैदानाला कै.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील क्रिडांगण नामफलकाचे उद्घाटन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका के.आर.कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री यादव बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे दत्तचे संचालक विजयराव सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन करे, मुख्याध्यापिका के.आर.कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास दत कारखान्याचे संचालक ॲड.प्रमोद पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शकिल नदाफ,सचिन कळंत्रे,प्रविण चौगुले,मधुकर कांबळे,विनोद झांबरे,सुखदेव डोंगरे,जयसिंग कोळी,शोभा डोंगरे , आरोग्य सेविका मगदूम,सरलाताई सूर्यवंशी,उज्वला परिट,अश्विनी सुतार,श्रीदेवी परिट,रोहिणी परिट,रूपाली वाघंबरे ,एम.एम.माळी,अलका खोत,सुचिता पाटील , रिझवाना चौधरी,कोमल पाटील,सचिन दुधाळे,सुशांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.आभार अध्यापिका सुचिता पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!