श्री पद्माराजे विद्यालयात कर्मवीर जयंती उत्साहात संपन्न

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सर्वप्रथम विद्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी वहिनींच्या प्रतिमेचे पूजन आणि चित्ररथाचे पूजन श्री आणि सौ अभिजीत बाबुराव शिंदे आणि रणजीत बाबुराव शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी शिरोळचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने उपस्थित होते. यानंतर कर्मवीर अण्णांच्या चित्ररथाची भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.यावेळी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी लेझीम, झांज पथक, ढोल ताशा पथकासह या मिरवणुकी मध्ये उपस्थित झाल्या होत्या.यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महापुरुषांच्या वेशभूषा करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. आर एस पी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मिरवणूक पार पाडली विद्यालयाचे प्राचार्य ए. ए. मुल्ला , उपमुख्याध्यापक टी.आर.गंगधर, रु.पा.माने कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पी. ए. हेरवाडे, एन. वाय. जाधव, नारायण महात्मे, सुभाष माळी, जी. एस.पाटील , अविनाश माने, विनोद मगदूम , ए व्ही जाधव, आर. टी. कोळके,व्ही.ए.गवंडी, एम. एन.पाटील, ए. डी पुजारी, आर. सी.नाईक,व्ही. व्ही. पाटील, एस. डी. पाटील श्री पद्माराजे विद्यालय आणि रु. पा. माने कन्या विद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी, शालेय समिती सदस्य उपस्थित होते. जयंतीच्या निमित्ताने मुख्य सभेचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी नऊ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

error: Content is protected !!