शिरोळ / प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांनी जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू विकास आघाडी या राजकीय पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंजुरीचे पत्र चार दिवसांपूर्वी आघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधु संजय पाटील यांना मिळाले आहे.त्यामुळे गत निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर हे आता राजर्षी शाहू विकास आघाडी पक्षाकडून निवडणूक लढवणार असे बोलले जात असताना आज आमदार यड्रावकर यांनी मोठा खुलासा केला आहे त्व म्हणाले माझा आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचा सद्या तरी काही संबंध नाही मी राजर्षी शाहू विकास आघाडीचा सदस्य देखील नाही त्यामुळे मी अपक्ष आहे.पुढंच पुढे बघू तसेच निवडणूक आयोगाने आघाडीला मान्यता दिल्याने संजय पाटील यड्रावकर यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कुरुंदवाड येथील एका आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता खुलासा केला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणूकीवरून खळबळ उडाली आहे.