‘दत्त’ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत “हे” ८ ठराव करा अंकुश संघटनेची मागणी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

प्रश्न क्रमांक – १

कारखाण्याच्या ताळेबंदात विज प्रकल्पात ११ कोटी ८८ लाख रुपये नफा झाल्याचे दाखवण्यात आले आहे
तो नफा ताळेबंदात कोठे दाखवला आहे.आणि कारखाण्याच्या नफा तोटा पत्रकात (एकत्रित) तो जमेला किंवा उत्पन्न म्हणून का घेतला नाही.त्याचबरोबर २०१९ पासून २०२४ पर्यंत या विज प्रकल्पाला नफा म्हणून किती रक्कम झाली आणि ती रक्कम कोणाला दिली याचा खुलासा करून ठराव घ्यावा ही विनंती.

प्रश्न क्रमांक – २

खाजगी विज कंपनी आणि दत्त साखर कारखाना यांच्यात झालेल्या करारा नुसार विज प्रकल्पा तुन मिळणारी रॉयल्टी ही शेतकऱ्यांना द्यायची होती.
ती रॉयल्टी ची रक्कम चालू अहवालात कारखाण्याचे नफा तोटा पत्रकात उत्पन्न म्हणून दाखवले आहे.
ती रक्कम ऊस दर सोडून अतिरिक्त दराच्या स्वरूपात शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे.२०१९ च्या हंगामा पासून आज अखेर रॉयल्टी ची रक्कम किती मिळाली आणि ती शेतकऱ्यांना किती दिली याचा खुलासा करावा आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ठराव घ्यावा

प्रश्न क्रमांक – ३

सभासद साखर १० हजार रुपये शेअर्स रक्कम होती त्यावेळी १०० रुपये होती.सभासद शेअर्स रक्कम १५ हजार झाली आहे.त्यामुळे किमान ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद शेतकऱ्यांना प्रति टन १ किलो साखर मिळावी असा ठराव करून येत्या हंगामा पासून ही टनेज साखर देण्यात यावी.

प्रश्न क्रमांक – ४

मागील हंगामा पूर्वी ठरलेल्या १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यात देण्यात येणार होता.तो तात्काळ देऊन मग शासनाची परवानगी घ्यावी कारण शेतकऱ्यांना जादा दर द्यायला शासनाने कुठेही अडकाठी आणलेली नाही.
चेअरमन आणि एम डी यांनी आपल्या सहीचे परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचा शब्द दिला होता तो पाळावा ही विनंती.

प्रश्न क्रमांक – ५

खाजगी विज कंपनी आणि दत्त साखर कारखाना यांच्यात झालेल्या करारा नुसार विज प्रकल्पा तुन मिळणारी रॉयल्टी ही शेतकऱ्यांना द्यायची होती.
ती रॉयल्टी ची रक्कम चालू अहवालात कारखाण्याचे नफा तोटा पत्रकात उत्पन्न म्हणून दाखवले आहे.
ती रक्कम ऊस दर सोडून अतिरिक्त दराच्या स्वरूपात शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे.२०१९ च्या हंगामा पासून आज अखेर रॉयल्टी ची रक्कम किती मिळाली आणि ती शेतकऱ्यांना किती दिली याचा खुलासा करावा आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ठराव करावा ही विनंती.

प्रश्न क्रमांक – ६

मागील हंगामा पूर्वी ठरलेल्या १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यात देण्यात येणार होता.तो तात्काळ देऊन मग शासनाची परवानगी घ्यावी कारण शेतकऱ्यांना जादा दर द्यायला शासनाने कुठेही अडकाठी आणलेली नाही.
चेअरमन आणि एम डी यांनी आपल्या सहीचे परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याचा शब्द दिला होता तो पाळावा ही विनंती.

प्रश्न क्रमांक – ७

गत हंगामात तुटलेल्या उसास आपण पहिला हप्ता म्हणून ३१०० रुपये दिले आहेत.त्या दरात शेतकऱ्यांना आपले पीक कर्ज व आपली वाढीव शेअर्स रक्कम पण देता आली नाही.त्यामुळे गत हंगामात तुटलेल्या उसास ३५०० रुपये अंतिम दर देणार म्हणून आजच्या सभेत चेअरमन यांनी घोषणा करावी आणि दिवाळी पूर्वी ती रक्कम शेतकऱ्यांना देत असल्याचे जाहीर करून ठराव घ्यावा.

प्रश्न क्रमांक – ८

वाढलेला उत्पादन खर्चाचा विचार केल्यास शेतकऱ्यांना सध्याच्या दरात ऊस शेती परवडत नाही.शेतकऱ्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साधनाचे दर वाढले पण त्या प्रमाणात उसाचा दर वाढला नाही.शेतकऱ्यांना ऊस शेती परवडावी व त्याला ऊस करण्यासाठी प्रोचाहान मिळावे म्हणून येत्या हंगामात पहिला हप्ता ४ हजार रुपये देत असल्याची कारखाण्याने घोषणा करून तसा ठराव करावा ही विनंती.

error: Content is protected !!