मौजे आगर येथे २० लाख रुपयाच्या विकास कामाचे उद्घाटन

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
मौजे आगर (ता.शिरोळ) येथे जिल्हा नियोजन समितीमधून शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नागरीसुविधा या योजने अंतर्गत २० लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सदर निधी मंजूर करणेसाठी कोल्हापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले.सदर निधीतून मोरे तळ येथे रस्ता कॉंक्रिटिकरण करणे साठी ६ लाख रुपये व एम एस ई बी कॉलनी येथे रस्ता करणेसाठी १४ लाख रुपये ही कामे होणार आहेत.
     उद्घाटनप्रसंगी अमरसिंह पाटील म्हणाले ह्या रस्ते कामामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे,पालकमंत्री यांच्या सहकार्याने मौजे आगरसह घालवाड,अर्जुनवाड, आलास व शिरोळ येथील पाणद रस्ता या सर्व कामांसाठी १ कोटी मंजूर होऊन सर्व कामांचे वर्क ऑर्डर होऊन कामे सुरू होतील व भविष्यात आणखी निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी मौजेआगर येथील माजी गांमपंचायत सदस्य अविनाश पाटील,संदिप मोरे,शिवाजी मोरे,फतेसीह मोरे,अलोक मोरे,ओमकार मोरे,देवदत्त लांडगे, राजाराम  पाटील, पुंडलिक बेरड, कुडगुटे साहेब नाईक सर यांच्यासह नागरिक उपस्थित होते
error: Content is protected !!