मोर्चा यशस्वी करण्यासाठी चर्मकार समाजातील पदाधिकाऱ्यांचा शिरोळ तालुका दौरा – सुनील माने

Spread the love

मुंबई आझाद मैदान येथे १ ऑक्टोबरला राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे विविध मागण्यासाठी होणार धडक मोर्चा

शिरोळ /  प्रतिनिधी 

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक -अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप ( नाना ) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे चर्मकार समाजाच्या हितासाठी व सर्वांगीण विकासाकरिता विविध मागण्यासाठी चर्मकार समाजाचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने म्हणाले,
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रमुख पदाधिकारी व चर्मकार समाजातील नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हजारो चर्मकार समाज बांधवांच्या उपस्थितीत होणार आहे.शासकीय पातळीवर अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी चर्मकार समाजातील घटकाला अजूनही उपेक्षित राहावे लागत आहे. त्यामुळे समाजाच्या विविध मागण्यासाठी संघटित होऊन चर्मकार समाज न्यायासाठी लढा देत आहे.मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भागात समाज जनजागृती केली जात असून या मोर्चात चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला अध्यक्षा सरोजताई बीसुरे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील माने, राज्य सल्लागार रावसाहेब चव्हाण, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर यांच्यासह शिरोळ तालुका चर्मकार समाजाचे नेते दलितमित्र डॉ अशोकराव माने , डॉ दगडू माने, राजेंद्र माने , आर एस चव्हाण आदि उपस्थित होते . दरम्यान , मंगळवारी १ आक्टोंबर रोजी मुंबई येथे होणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

error: Content is protected !!