शिरटी / प्रतिनिधी
श्री ज्ञानदीप शिक्षण संस्था संचलित शिरटी हायस्कूल शिरटी विद्यालयात निर्भया पथक शिरोळ पोलिस ठाणे येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.ए.रोडे यांनी केले.यावेळी मुख्याध्यापक ए ओ खवाटे व सौ.एस एम पोतदार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.निर्भया पथक जयसिंगपूरचे प्रमुख प्रविण माने यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती व वैयक्तिक सुरक्षा तसेच आपली भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.आपल्या कुटुंबापासून समाजापर्यंत वर्तनाविषयी आपण कसे जागरूक असावे याची जाणीव मार्गदर्शनात करून दिली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विद्या राऊत पोलीस उपनिरीक्षक शिरोळ यांनी वैयक्तिक सुरक्षा,गुड टच व बॅड टच,व्यसनमुक्ती, मोबाईलचा अतिरेक वापर,मुलींच्या विषयी चांगला दृष्टिकोन व मुलींच्या आरोग्याबाबत सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास निर्भया पथकातील इतर सहकारी कर्मचारी उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व अध्यापक-अध्यापिका, अध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या शेवटी निर्भया पथकाचे आभार सौ.एस डी पाटील यांनी मानले.