शिरोळ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस असोसिएशनच्यावतीने अभियंतादिन साजरा
शिरोळ / प्रतिनिधी
बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभियंता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असताना प्रत्येक कामात बुद्धी कौशल्याचा वापर करून गुणवत्तापूर्ण दर्जेदार वास्तु उभारण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन कोल्हापूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक इंजिनीअर सुधीर हांजे यांनी शिरोळ येथील टारे क्लब हाऊस येथे शिरोळ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस असोसिएशनच्यावतीने आयोजित अभियंतादिन समारंभात केले.असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शेट्टी यांनी स्वागत केले उपस्थित मान्यवरांचे हस्ते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.इंजिनिअर हेमंत पंडित यांनी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला.प्रथमेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी उपस्थित सर्व अभियांतांचा डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील फाउंडेशनच्यावतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या समारंभात जालना येथील एस आर जे स्टीलमधून उत्पादन होत असलेल्या बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या सुधीर हांजे यांनी बांधकाम क्षेत्रातील काँक्रीट या विषयावर उपस्थित ज्युनिअर इंजिनिअर्स व आर्किटेक्ट यांना साईटवरती काँक्रीट कशा पद्धतीने चांगले करावे त्याचे मटेरियल तपासणी कशी करावी जेणेकरून उत्कृष्ट काँक्रीट होऊन बांधकामाचा दर्जा सुधारेल त्यासाठी जे मटेरियल लागतं त्याची कॉस्ट त्याची उपयोगिता याविषयी माहिती देत घर मालकांना व साईटवरील कामगारांना एकूण मटरेलच्या गुणवत्तेविषयी माहिती कशी द्यायची गुणवत्तापूर्ण काम कसे करून घ्यायचे व ते किती गरजेचे आहे. मालकांना कसे पटवून द्यायचे याविषयी सविस्तर माहिती दिली.या समारंभास एस आर जे स्टील कंपनीचे सेल्स मॅनेजर अनिल खरात, प्रसाद पिसे,विक्रेते सुरज मुर्तुजे,आसिफ घोरी, पत्रकार चंद्रकांत भाट,शिरोळ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित पाटील,खजिनदार लक्ष्मण भोसले, सदस्य गजानन पाटील, विनोद मुळीक, वैभव काळे, प्रथमेश पाटील, हेमंत पंडित, रणजीत माने, अभिजीत माळी, सुमित शेट्टी, रोहित माळकर, गणेश अरागे, वैभव शिंदे, दादासो काळे, रणजीत पाटील,नितीन माने- चुडूमुंगे, मोहसीन गवंडी, वैभव माने, अजिंक्य पाटील, सुहास पोळ, गणेश चुडूमुंगे, सुमित देसाई, निलेश पाटील, संकल्प निधोने, विनायक बनकर, रवी महात्मे, निहाल कोळी, अभिजीत कोळी,दादासो माने,आकाश फल्ले, अमरसिंह माने,बापू कांबळे, किशोर पाटील, अनिकेत जाधव, सुरेश वाणी, सौरभ घाटगे, सचिन नरके, अमर मोहिते यांच्यासह तालुक्यातील इंजिनिअर्स आणी आर्किटेक्ट स मोठ्या संख्येने उपस्थित होते. असोसिएशनचे सचिव स्वप्निल ढेरे यांनी आभार मानले राजेंद्र प्रधान यांनी सूत्रसंचालन केले.