शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार डी.आर.पाटील यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई राजाराम पाटील यांचे गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता शिरोळ येथील पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.