जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील प्रतिष्ठीत नागरीक सातगोंडा आणगोंडा पाटील यांचे गुरूवार दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांनी जयसिंगपूर नगरपालिकेकडे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली होती.शिरोळ तालुक्याचे माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सन २०१७ साली मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता.त्यानुसार त्यांचा देह सांगली येथील भारती विद्यापीठाच्या वैद्यकिय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.ते रमेश उर्फ सतीशकुमार पाटील (भाऊजी) व जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी शिरीष पाटील यांचे वडील व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.अस्मिता सतिशकुमार पाटील व डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेच्या संचालिका सौ.संध्या शिरीष पाटील यांचे सासरे तर श्री दत्त उद्योग समुहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांचे इवाई होत.त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दुःखद प्रसंगी भेट देवून पाटील कुटूंबियांचे सात्वंन केले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. फोटो पूजन आज शुक्रवार दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता जयसिंगपूर येथील निवासस्थानी होणार आहे.