हातकणंगले / प्रतिनिधी
भादोले इथल्या विवाहितेस माहेरहून हुंड्यासाठी पैसे आणण्यास तगादा लावून मारहाण होत असल्याने या जाचाला कंटाळून नवविवाहितेने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वीस वर्षीय नवविवाहितेचे नाव अनुराधा ऋषिकेश मदने असे असून ती गरोदर होती. मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती ऋषिकेश बाजीराव मदने, सासू शोभा बाजीराव मदने,ननंद पुनम संपत जाधव यांच्यावर पेटवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती की हातकणंगले तालुक्यातील भादोले इथल्या बावीस वर्षीय ऋषिकेश बाजीराव मदने याचा विवाह एक वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील वासुंदे इथं राहणाऱ्या परसराम भगवान यलमार यांची मुलगी अनुराधा हिच्याशी झाला होता.तिला बाहेरून पैसे आणण्यासाठी नवरा सासू आणि नणंद यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास होत होता.ती गरोदर असलेले वारंवार झोपत होती.याही कारणावरून पुन्हा वाद होऊन त्रास सुरू होता.या त्रासाला कंटाळून अनुराधा हिने मंगळवारी घरामध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.कुटुंबाने तात्काळ तिला सीपीआर मध्ये दाखल केले होते.पण तिला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने तिची आत्महत्या नसून तिचा खून आहे असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी करत सीपीआर मध्ये मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी पती आणि सासूंना शोधण्यासाठी भादोले इथे शोधा शोध केली पण ते तिथून गायब झाले होते.त्यामुळे अनर्थ टळला होता.गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर पेटवडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यानंतर
सायंकाळी पती ऋषीकेश बाजीराव मदने, वय 22,सासू शोभा बाजीराव मदने वय 45 आणि वाठार इथं राहणारी नणंद पुनम संपत जाधव वय 32 यांच्यावर मयत अनुराधाचे वडील परसराम यलमार यांनी फिर्याद दाखल केली आहे.