कुंभोज / आकाश शिंदे
कुंभोजसह हिंगणगाव,दुर्गेवाडी,नेज,शिवपुरी, नरंदे परिसरात ‘मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सुमारे शंभरहून अधिक सार्वजनिक मंडळांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.दरम्यान,येथील पन्नासहून अधिक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व सूर्योदय युवक संघटना यांनी विर्सजन मिरवणुकीत सहभागी मंडळांना श्रीफळ देऊन सन्मान केला.पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभोजचे बीट अंमलदार रविकांत शिंदे व सहकारी यांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न झाली.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत लाडक्या बाप्पाला निरोप दिला.