कोळी समाज करतोय “संस्कृती” जोपासण्याचे कार्य

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

कोळी समाजाकडे जोकमार देवाची परंपरा- संस्कृती प्राचीन काळापासून मोठ्या भक्तिभावाने गावोगावी जाऊन जोकमार देवाला कोळी समाजातील स्त्रिया करत असतात.या जोकमार देवाला बुट्टी मध्ये बसवून गावोगावी जात असतो.जोकमार फिरल्यामुळे भरपूर धनधान्य आणि गावभर संकट येऊ नये असे समजले जाते.
गावोगावी घरोघरी जोकमार गेल्याने धान्य,कपडे देवाला लोक देत असतात.ही परंपरा कोळी समजाकडे गणपती उत्सवात सुरू होते. जोकमाराचा जन्म कुंभाराच्या घरात पुढे कोळी समाजाकडे त्याची जोपासना केली जाते. त्याचा अंत चतुर्थीला होतो,असे पूर्वीपासून सांगितले जाते.चालू वर्षी ही परंपरा जोपासण्याचे कार्य श्री.दिलीप कोळी, अशोक कोळी,गणपतराव कोळी,संजय कोळी सर,आप्पासो कोळी,राजेंद्र कोळी,विजय कोळी,संजय कोळी कोर्ट,बाबुराव कोळी.समाजातील यांचेकडे हा मान यावर्षी आलेला आहे तरी हे मानकरी आपले काम मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.

error: Content is protected !!