‘मंजूर मंजूर’ घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंडाचा वापर – माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम

Spread the love

हातकणंगले प्रतिनिधी / सुकुमार अब्दागिरे

सत्ताधाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेच्या घटनेचा आम्ही निषेध करीत असुन सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय वाचन करताना ‘ मंजूर ‘ ‘ मंजूर ‘ घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंड आणले होते . मंजूरची घोषणा देणारा एक ही कारखान्याचा सभासद नव्हता. सभेतील वाचन केलेले सर्व विषय आम्हाला नामंजूर आहेत. कारखान्याचे चेअरमन सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता ‘ ऐ तू खाली बस ‘ असे ज्येष्ठ सभासदांना धमकावत होते . असा आरोप माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना केले .
पुढे रजनीताई मगदूम यांनी आरोप करताना सांगितले . आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार संपत असल्याचे दिसले. कारखान्यात गुंडगिरी व फसवेगिरी वाढली आहे . स्वर्गीय आण्णांनी सभासद व कामगारांना मालक समजून कामकाज केले.पण सध्या कारखान्यात मनमानी , झुंडशाही चालु आहे.कारखान्याची प्रॉपर्टी टिकावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . तसेच कारखान्याला सभासदांचा ऊस घेतला जात नाही . बाहेरच्या लोकांचा ऊस आणला जातो . सध्या स्वर्गीय अण्णांच्या विचारांविरुद्ध कारखाना चालविला जात आहे . कामगारांना पगार व तोडणी वाहतुकीची देणी देण्यासाठी माझी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून लक्ष्मी ऑरगॅनिक कडून पैसे आणले होते . तसेच कारखाना वाचविण्यासाठी आमचा लढा सुरू राहणार असल्याचे शेवटी सांगितले .
पत्रकार परिषदेस यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव , शिरोळ पं.स. चे सभापती भालचंद्र कागले, अशोक पाटील (कबनूर ), लिंगायत समाजाचे अध्यक्ष आण्णासाहेब शहापुरे, साखर कारखाना सेवानिवृत्ती संघाचे अध्यक्ष सुकुमार गडगे, रमेश चौगले, शोभा कोळी, महादेव कुंभार, संतोष आवटी, बाळासाहेब कुंभार, आण्णाप्पा दतवाडे,माजी. संरपंच शिवाजी कांबळे, रायगोंडा पाटील, राजेंद्र माने, दीक्षित सर अदि मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!