शिरोळ / प्रतिनिधी
विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते बजरंग काळे गुरुजी यांची नात कु.सई संतोष काळे हिने दिल्ली येथील एन.सी.सी.स्थल सैनिक कँप यशस्वीरित्या पूर्ण केलेबद्दल शिरोळ मधील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच अमरसिंह पाटील यांनी नगराध्यक्ष पदाची पाच वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करून शिरोळ शहराच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल बजरंग काळे गुरुजी परिवारामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बाबा पाटील,ज्ञानदेव जाधव,अर्जुन काळे,डॉ.अरविंद जाधव,संभाजी जाधव, धुमाळ सर, विजयसिंह देशमुख,संतोष काळे यांचेसह काळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.