श्री क्षेत्र घोसरवाड सिध्देश्वर देवाच्या नवीन अश्वाचे जल्लोषात स्वागत

Spread the love
घोसरवाड / प्रतिनिधी
घोसरवाड येथील श्री सिध्देश्वर देवाच्या अश्वाचे महिन्याभरा पूर्वी निधन झाले होते.अश्वाच्या निधनाने गावात शोककळा पसरली होती त्यानंतर अवघ्या १०  दिवसांत श्री सिद्धेश्वर देवाचा वर्धापन दिवस होता.प्रत्येक वर्षी ‘श्री’चा अभिषेक व महाप्रसाद केला जात होता पण यावर्षी अश्वाचे निधन झाल्यामुळे फक्त अभिषेक व पूजा करून वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा केला होता.गावकऱ्यांनी निश्चय केला होता की ज्यावेळी श्रीनाथाचा नवीन अश्व येईल त्यावेळीच गावजेवण व महाप्रसाद करायचा आणि आज नाथाचा वार म्हणजे रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता  घोसरवाड नगरीत व नाथाच्या पांढरीत नवीन अश्वाचे मोठ्या दिमाक्यात व जल्लोषात अश्वाचे स्वागत करण्यात आले श्रीनाथाना गव्हाच्या खिराचा मान असल्याने आज महाप्रसाद करून अश्वाचे स्वागत करण्यात आले.यावेळी महिलांनी आमलीच्या घागरी,ढोल,ताशा,हालगी,बॅन्ड यासारखे वाद्यांचा गजरात गावातून अश्वाचे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.लोकांचा जनसुमह पाहून जनू दसरा महोत्सवाचे स्वरूप आले होते.यावेळी घोसरवाड गावातील धनगर समाज व गावकरी नाथांचे हजारो भाविक उपस्थित होते.
error: Content is protected !!