शेतकऱ्यांच्या मालकीचा विज प्रकल्प फक्त दोघांच्या घशात – चुडमुंगे

Spread the love
दोन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत माजी चेअरमन गणपतराव पाटील म्हणत होते की विज प्रकल्प कारखाण्याच्या मालकीचा आहे.आम्ही निवडणुकीत पण सांगितले आहे आणि आत्ता पण पुन्हा सांगतो विज प्रकल्प माजी चेअरमन आणि एम डी यांनी आपल्या नावावर केला आहे तो त्यांनी बेकायदेशीररित्या घशात घातला आहे.अजून पण माजी चेअरमन आणि एम डी म्हणत असतील की हा विज प्रकल्प शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे.मात्र या विज प्रकल्पाला गेल्या वर्षी 11 कोटी 88 लाख रुपये नफा झाला आहे.तो नफा कारखाण्याच्या ताळेबंदात कोठे दाखवला आहे हे सांगावे असे खुले आव्हान आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी दिले आहे.चुडमुंगे पुढे म्हणाले दत्त कारखाण्याने नुकताच जो अहवाल सभासदांना दिला आहे.त्या अहवालात दत्त साखर कारखाण्याचे नफा तोटा पत्रक (एकत्रित) दिले आहे.त्यात कारखाण्याचे उत्त्पन्न म्हणून विज प्रकल्पाने दिलेली रॉयल्टी 13 कोटी रुपये दाखवले आहेत.पण विज प्रकल्पाला झालेला नफा 11 कोटी 88 लाख रुपये मात्र उत्पन्नात दाखवलेला नाही. करारानुसार रॉयल्टी पण शेतकऱ्यांना द्यायची आहे.पण ती रक्कम शेतकऱ्यांना यांनी कधीच दिली नाही.गेले 4 वर्ष यात होणारा नफा पण हे दोघेच वाटून घेत आहेत. विज प्रकल्प कारखाण्याच्या जागेत,प्रकल्प विकत घेतला कारखाण्याच्या पैशातून आणि त्याचे मालक मात्र हे दोघे आणि त्यात झालेला नफा पण या दोघांच्या मालकीचा
कसा असा गंभीर आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.
error: Content is protected !!