न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरमध्ये अभियंता दिन साजरा
शिरोळ / प्रतिनिधी
देशाच्या यशस्वी प्रगतीसाठी अनेकांचे योगदान कारणीभूत ठरत आहे.तसेच देशातील सर्वच अभियंतांमध्ये बलशाली आणि आधुनिक भारत निर्माण करण्याची क्षमता आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी केले.मौजे आगर (ता शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात रोटरी क्लब ऑफ हेरिटज सिटी शिरोळ व विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अभियंतादिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौ निता माने माने केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ अभिजीत माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या शिक्षिका सौ जयश्री पाटील यांनी स्वागत व प्रस्तावित केले.
अभियंता दिनाचे औचित्य साधत शिरोळ व मौजे आगर येथील अभियंता नितीन शेट्टी, लक्ष्मण भोसले, गजानन पाटील, विक्रमसिंह भोसले,कुशल पाटील,वैभव माने, स्वप्निल ढेरे, सत्यजित पाटील, प्रथमेश पाटील, सागर पाटील, हेमंत पंडित,रणजीत माने, नितीन पाटील, अविनाश दाभाडे,पृथ्वीराज दाभाडे, अवधूत दाभाडे, मनोज सावंत,ओंकार दाभाडे,निलेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मौजे आगरचे माजी सरपंच अमोल चव्हाण, इंजिनिअर नितीन शेट्टी, गजानन पाटील, रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे खजिनदार चंद्रकांत भाट, आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील,इव्हेंट चेअरमन अमित जाधव, सदस्य डॉ अरविंद माने,संजय शिंदे,भरत गावडे,माजी नगरसेवक एन वाय जाधव,विजयसिंह पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील,फत्तेसिंह मोरे, अध्यापक पृथ्वीचंद माछरेकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन बागुल यांनी केले.