“शेतकऱ्यांनो दत्तचा अहवाल वाचला का ?” – धनाजी चुडमुंगे

Spread the love

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आपल्या अहवालात एकूण कर्जाची आकडेवारी दिली आहे.त्यानुसार ऑफ इंडिया – 150 कोटी,एन सी डी सी – 200 कोटी,राज्य शिखर बँक –  150 कोटी एकूण तारण कर्ज – 500 कोटी तारण कर्ज अर्थात खेळते भांडवली कर्ज बँक तर बँक ऑफ इंडिया-189 कोटी,राज्य शिखर बँक-130 कोटी,केंद्र सरकार – 64 कोटी असे एकूण मुदत कर्ज – 383 कोटीचे मुदत कर्ज हे विस्तारिकारणासाठी काढलेलं कर्ज त्यामुळं दत्त साखर कारखाण्यावर एकूण कर्ज  883 कोटी आहे.गट वर्षी यातील फक्त मुदत कर्जाचे निव्वळ व्याज 33 कोटी 12 लाख रुपये झाले होते त्या निव्वळ व्याजातील 23 कोटी रुपये कारखाण्याला यावर्षी फेडता आले आहे.तसेच तारण कर्ज आहे त्याचे व्याज अजून वेगळेच आहे.तारण कर्जाचे व्याज साधारण 40 कोटी रुपये होईल.कारखाण्याला एका वर्षाचे मुदत कर्जावरील व्याज पण भागवता आले नाही मुद्दल फेडण्याचा प्रश्नच नाही.निवडणुकीच्या वेळी आम्ही कर्जाचा विषय सभासदांना सांगितला होता पण सभासदांनी विचार केला नाही.अशा प्रकारे कारखाना हा डबघाईला आणला जात आहे.या सगळा भ्रष्ट कारभाराला कारखाना विश्वस्त आणि कार्यकारी संचालक जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता शिरोळ येथे केला आहे.श्री दत्त साखर कारखाण्याचे पुढचे भविष्य चांगले नाही असं या एकूण कर्ज आणि व्याजाच्या आकडेवारी वरून दिसते आहे असे ही धनाजी चुडमुंगे शेवटी म्हणाले.दरम्यान धनाजी चुडमुंगे यांच्या आरोपाबाबत श्री दत्त साखर कारखाना विश्वस्त आणि कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

error: Content is protected !!