हातकणंगले / प्रतिनिधी
माणगाववाडी (ता.हातकणंगले) येथे यल्लमकुडी माळभाग परिसरात सरकारी ओढयात उघडयावर गावठी दारू तयार करणाऱ्या इसमाविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून अधिक माहिती अशी,माणगाववाडी येथे शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळ सुमारास यलमकुडी येथे ओढयात असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला.यावेळी दारू तयार करण्यासाठी आलेल्या इसमाने दुचाकी तिथेच सोडून पलायन केले.हातकणंगले पोलिसानी घटनास्थळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, पक्के रसायन,भांडी,बॅरेल जप्त केले. याप्रकरणी बाबासो सुभाष खोत (रा.माणगाववाडी),आकाश सुनिल भोसले (रा. रूकडी),आकाश मनोहर कांबळे या तिघावर गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत पोलीस निरिक्षक शरद मेमाने, सुरजानंद चव्हाण,मच्छिद्र पटेकरी, समीर मुल्ला,राजेंद्र उगलमुगले,गजेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला.या घटनेची फिर्याद पो कॉ.अतुल आनंदराव निकम यांनी दिली आहे.कारवाईने बेकायदेशीर दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.कारवाईने हातकणंगले पोलिसांचे कौतुक होत आहे तसेच कारवाईत सातत्य राहावे अशी मागणी ही नागरिकातून होत आहे.