हातकणंगले प्रतिनिधी / सुकुमार अब्दागिरे
हातकणंगले विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदार संघ आहे.येथील आमदार हा महायुतीचा झाला पाहीजे, याकरिता शिवसैनिकांनी झटून कामाला लागावे.तसेच महायुतीकडे विधानसभेसाठी हातकणंगले पं.स.चे माजी सभापती व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष अविनाश बनगे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खास. धैर्यशील माने यांनी दिली.हातकणंगले तालुका शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .
पुढे बोलताना खास.माने यांनी सांगितले,हातकणंगले येथील कार्यालयात आल्यानंतर नागरिकांना आधार वाटला पाहीजे.प्रत्येक सरकारी कार्यालयात नागरिकांची कामे सन्मानाने झाली पाहीजेत.तालुक्यातील प्रत्येक गावात,वॉर्डात शाखा काढुन संघटन बळकट झाले पाहीजे तसेच शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांने प्रेरित होवुन काम करण्याची गरज आहे .
कार्यक्रमास पं.स.चे माजी सभापती अविनाश बनगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय कुमार स्वामी,तालुका प्रमुख अजित सुतार,युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोरख शिंदे,तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता भोसकर- पाटील य यांच्यासह शिवसेनेचे सर्व शहरप्रमुख,उपशहर प्रमुख, उप तालुका प्रमुख,विभाग प्रमुख,शाखाप्रमुख,तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.