“धक्कादायक प्रकार” सावत्र आईन “या” कारणातून ५ वर्षाच्या मुलीला दिले गरम चटके

Spread the love

पु.शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

 

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी इथ अंथरुणात लघुशंका करत असल्याच्या कारणातून सावत्र आईन पाच वर्षाच्या मुलीला लोखंडाचे गरम चटके दिल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली.याप्रकरणी पती शुभम मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम गोविंद मगरे हे त्यांची पत्नी पूजा हिच्यासोबत हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी गावात राहतात.दोघांचाही हा दुसरा विवाह असून दोघानाही पूर्वीची अपत्ते आहेत. आज शुभम मगरे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांची पत्नी पूजा मगरे हिने अंथरुणात लघु शंका करत असल्याच्या कारणावरून पाच वर्षीय बालिकेला लोखंड उलथानंने गरम करून गालावर व गळ्यावर चटके दिलेत.यामध्ये ही पाच वर्षीय बालिका जखमी झाली आहे.दरम्यान शुभम मगरे हे कामावरून परत आल्यानंतर हा गंभीर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.शुभम मगरे यांनी पत्नी पूजा मगरे हिच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिल्यावर पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!