पुलाची शिरोली / प्रतिनिधी
डॉल्बीचा दणदणाट आणि लेझरच्या झगमगाटी वातावरणात पुलाची शिरोलीतील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.
शिरोली गावामध्ये रजिस्टर असलेले ६७ व तात्पुरते ३९ सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.गुरुवारी सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन मिरवणूक पार पडली. सायंकाळी सहापासून शिरोलीचा मध्यवर्ती भाग,माळवाडी भाग छत्रपती शिवाजीनगर आदी भागात गणेश मंडळाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीमध्ये मंडळाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या रंगाचे झेंडे पीव्हीसी पाईप घालून गरगरा फिरवत होते भगव्या टोप्या,गणपती बाप्पा मोरयाच्या पट्ट्या डोक्याला बांधून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मधूनच मंडळाचे कार्यकर्ते डॉल्बी सिस्टम व लाईट शो असलेल्या ट्रॅक्टर वरती चढून डान्स करत होते.या मिरवणुकीमध्ये गावातील नेत्यांनाही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डॉल्बीच्या ठेक्यावर डान्स करावा लागला.पुलाची शिरोली मध्ये सुमारे ५० सार्वजनिक गणेश मंडळांकडून मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करण्यात आला.शिरोली एमआयडीसी पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य केल्याची पहावयास मिळाले पुलाची शिरोली येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी सर्रास डॉल्बीचा वापर केल्यामुळे
शिरोली एमआयडीसी पोलीस काय कारवाई होणार याकडे शिरोली गावाचे लक्ष्य लागली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला आवाहन केले होते. तसेच आव्हान पुलाची शिरोली मधील सर्व गणेश मंडळांना केले होते.पण या आव्हानाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पुलाची शिरोली येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी नियम धाब्यावर बसवून सुमारे ६० सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बी साऊंड सिस्टिम व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे पहावयास मिळाले. गावभाग,सर्जेराव खान गल्ली,चव्हाण गल्ली,मोरे गल्ली , समता परिसर,सोडगे माळवाडी, रेणुका नगर, शिरोली हौसिंग सोसायटी, शास्त्रीनगर, सावंत कॉलनी ,कोरेगावकर कॉलनी, शिवाजीनगर, यादववाडी या भागातील मिरवणुकांमध्ये तरुणांनी डॉल्बीचा .
सर्रास वापर केला.शिरोली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गावातील काही मंडळांनी आयोजित केलेले महिलांचे नाच गाण्याचे कार्यक्रम बंद पाडले होते. तसेच काही मंडळावर कारवाई केली आहे.तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये गैरमार्गाचा कोणीही वापर करू नये, अशा सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी व फौजदार प्रमोद चव्हाण यांनी दिल्या होत्या. पण त्याकडे शिरोलीतील तरुण मंडळांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून अखेर डॉल्बीच्या कर्णकर्कश्यू आवाजात गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या.
यामुळे पोलीस संबंधित मंडळांवर काय कारवाई करणार याकडे शिरोलीसह परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.