पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली पुलाची येथील घरगुती गौरी गणपतीसह सार्वजनिक गणेश मुर्तीचे डाॅल्बीच्या दणदणाट आणि लेझर लाईटच्या झगमगाटी वातावरणात मोठ्या भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत पार पडली.शिरोली पुलाची ता हातकणंगले गावात जवळपास १५० लहान मोठे मंडळ असून या मंडळानी मोठ्या भक्तिमय वातावरणात मूर्तीची प्रतिष्ठापना करत पाच दिवस मनोभावे पुजा करून घरगुती गौरी गणपती विसर्जनादिवशीच गावातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तीचेही विसर्जन करण्याची परंपरा असल्याने गुरूवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन गाव तलावात करण्यात येत होते त्याच बरोबर पर्यावरण प्रेमीनी मूर्ती दान करत आपले कर्तव्य पार पाडले तर सायंकाळी ६ वाजण्यासुमार गावातील सार्वजनिक मंडळाच्या गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूकीस डाॅल्बीच्या दणदणाट आणि लेझरच्या झगमगाटी सुरुवात झाली यावेळी काही मंडळाकडून पारंपारिक वाद्याचा व बालमंचुसाठी साठी आकर्षण असणारे मिकी माऊस अशा वेगवेगळी वेशभूषा परिधान करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूकीची शोभा वाढवली.यावेळी शिरोली पोलिसांनी मिरवणूकी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मोठा प्रमाणात बंदोबस्त तैनात करून योग्य नियोजनबद्ध मिरवणूक रात्री उशिरापर्यंत पार पाडून आपले कर्तव्य बजावले