पी एम पाटील यांचा “तो” डाव मी उधळून टाकणार – रजनीताई मगदूम

Spread the love

हातकणंगले प्रतिनिधी / सुकुमार अब्दागिरे

देशभक्त रत्नाप्पाआण्णा कुंभार यांनी पंचगंगा साखर कारखाना चालवत असताना सभासद व शेतकरी व कामगार यांच्या हिताचाच निर्णय घेवून समतोल साधत होते.मात्र आत्ताचे सत्ताधारी यांनी फक्त स्वतःचाच विकास साधत शेतकरी वर्ग कामगारवर्ग व सभासद यांना वाऱ्यावर सोडले आहे.आयत्या पीठावर रांगोळी घालणारी व्यक्ती म्हणजे पी.एम.पाटील यांनी कारखाना गिळूकत करायला उठले आहेत.मात्र तो डाव मी उधळून टाकणार अशी टिका रजनीताई मगदूम यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत मध्ये केली.सत्ताधारी यांनी फक्त सत्तेचा गैरफायदा घेत कारखाना चालवण्यास दिला. सभासदानी उस नोंद करुन ही अनेक सभासदांचे उस कारखान्यापर्यत आणे पर्यत नुसते राजकारण केले. राजकारणाच्या आकासापोटी बाहेरून उस आणून बऱ्याच शेतकरी सभासदावर अन्याय केला. कारखानान्यानी घेवून ठेवलेल्या सर्व जमिनी विकून टाकल्या त्याचा हिशोब नाही असेही ते म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेत शिरोळचे माजी पंचायत समिती सभापती भालचंद्र कागले,म्हणाले,ज्यांनी कारखाना उभा केला,सभासद,कामगार व शेतकरी वर्गाचे हित जोपासण्याचे काम केले.त्यांचा वारस यांना चालत नाही, मात्र पी.एम.पाटील यांना त्याचे वारस कसे चालतात? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी कबनूर लिंगायत समाजाचे अशोक पाटील म्हणाले,देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी कामगार यांना राहण्यासाठी चांगले घर असावे म्हणून राहण्यासाठी उत्तम घरे बांधून दिली.मात्र आत्ताचे सत्ताधारी यांनी तिकडे लक्षच दिले नसले मुळे घराची अवस्था वाईट झाली आहे.आत्ता सर्वाना कळून चुकले आहे की आण्णाचे वारसदार रजनीताई मगदूम यांनीच कारखान्याकडे लक्ष घातले पाहीजे तरच पुढच्या काळात कारखाना टिकेल,सहकार टिकेल,बोरगाव, कोरोची,कुरुंदवाड येथील जमीन कुठे गेल्या,४० कोटींच्या ठेवीचं काय झाला त्याच ऑडीट झाल का? असे अनेक प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.या पत्रकार बैठकीत भालचंद्र कागले,अशोक पाटील,आण्णासाहेब शहापूरे, सुकुमार गडदे,संतोष आवटी,बाळासाहेब कुंभार, आण्णापा दत्तवाडे,शिवाजी कांबळे,रायगोंडा पाटील, श्रीधर शिंदे,राजेंद्र माने आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!