कुंभोज परिसरात रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनची चौकशी करा – कुंभोज ग्रामस्थ

Spread the love
कुंभोजसह हातकणंगले तालुक्यातील परिसरामध्ये मागील काही दिवसापासून रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोन कॅमेरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्री फिरणाऱ्या ड्रोन कॅमेरे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरत असून त्याबद्दल वेगवेगळ्या तर्कवितर्क लावले जात आहेत.सदर ड्रोन कॅमेरे कोणत्या कारणासाठी व कोण रात्री चालवत आहेत या संदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावे जेणेकरून ग्रामस्थांमध्ये जे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किंवा संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे ती दूर होईल.अशा आशयाचे निवेदन कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना देण्यात आले.दरम्यान सदर ड्रोन कॅमेरामुळे अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.तसेच वरिष्ठांकडून आम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळाली नाही किंवा तशा सूचना झालेले नाहीत.सदर ड्रोन कॅमेरा बद्दल आम्ही योग्य ती चौकशी करून आपणास कळविण्यात येईल.रात्री अपरात्री घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस गस्त वाढवण्यात आले आहे. तसेच शंकास्पद वाटल्यास हातकणंगले पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा. 112 या क्रमांकावरती तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी केले.यावेळी विनायक पोतदार,बाळासाहेब डोने,सत्यजित तोरस्कर,निवास माने,सागर सुवासे,दिपक कोळी,सुरेश भगत,सचिन भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!