निखिल अशोक शिंदे यांची आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदी निवड
कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे
सन 2023 24 या वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये निखिल अशोक शिंदे यांची आरोग्यसेवा आयुक्तालय मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदावरती निवड झाली.सदर परीक्षा 2023 मध्ये सरळ सेवा पद्धतीने झाली असून यामध्ये त्यांची निवड झालेली आहे.निखिल अशोक शिंदे याआधी जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करत होते.अखेर त्यांचा अथक अभ्यास व परिश्रम यांचे त्यांना फळ मिळाले आहे.मला जे यश मिळालेले आहे त्यामागे माझे आजोबा व माझे वडील यांचा आशीर्वाद आहे व त्यांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळालेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
आजोबा व वडिलांनंतर त्यांना काकांनी पाठबळ दिले आहे.मला माझी आई व काका काकी व आजी यांनी सहकार्य केले व मला पाठबळ दिले यामुळे मी आज यशस्वी होऊ शकलो असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम करत असताना माझ्याकडून आपल्या लोकांना योग्य तो सल्ला व मार्गदर्शन मी करीन आणि मी समाजाप्रती एक देणं लागतो त्याबद्दल मी बांधील राहीन व माझे काम निरपेक्ष पद्धतीने पार पाडेन असे मत त्यांनी व्यक्त केले.
निखिल यांची निवड झाल्याचे समजतात नातेवाईक व मित्र परिवाराकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.