इमरान मोमीन यांची अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी निवड

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले ) येथील इम्रान शमशुद्दीन मोमीन यांची अल्पसंख्यांक विकास मंडळाच्या हातकंणगले तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अल्पसंख्यांक विकास मंडळातर्फे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शोएब असिफ खाटीक, प्रदेश सचिव जुबेर रज्जाक खाटीक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असून या काळात सामाजिक शैक्षणिक, कृषी, क्रीडा महिला अधिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून संघटनेला बळकट करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या निवडीमुळे इमरान मोमीन यांचे परिसरातून कौतुक होत आहे. निवड प्रसंगी जावेद मुल्ला, वसीम मोमिन, असिफ मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!