निर्माण केल्याने शिरोली येथील प्रणित प्रशिक युवक मंडळाच्या १२ जणांवर आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता शिरोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरोली पोलिसांनी मंगळवारी रात्री पाच ते सहा मंडळाच्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.पुलाची शिरोली ता हातकणंगले येथील सार्वजनिक मंडळांचे देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते.यावेळी शिरोली पोलिसानी गावातील प्रत्येक मंडळाला ध्वनीप्रदूषण व रस्त्यावरील वाहतूकीस अडथळे निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे वारंवार आवाहन करून देखील शिरोली माळवाडी भागातील प्रणित प्रशिक युवक मंडळाने मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 11 वजाण्याच्या सुमारास आपल्या कार्यक्रमात महिला नृत्यांगना आणून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करून लोकांना आकर्षित करण्यासाठी अश्लिल हावभाव करुन असभ्य वर्तन केले व सार्वजनिक रस्त्यावरुन येण्या-जाण्या-या वाहनास अडथळा निर्माण केल्याने मंडळाचे अध्यक्ष वैभव राजु बेडेकर,उपाध्यक्ष प्रविण संयोग श्रीमंत कांबळे, सेक्रेटरी प्रविण रमेश राठाडे,सदस्य गौतम गणेश देशपांडे,सायील संजय कांबळे,सतिश भिमराव कांबळे,चिन्मय जगदीश कांबळे,विजय तानाजी गोंदणे,अनिकेत अरुण बनगे,प्रथमेश मोहन ढाले,रेवाप्पा नागेश कांबळे,रविंद्र शिवाजी कांबळे सर्व राहणार शिरोली पुलाची यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरोली पोलिसानी गावातील मंडळाना ध्वनीप्रदूषण व रस्त्यावरील वाहतूकीस अडथळे निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे वारंवार आवाहन केले.पण गावातील काही मंडळानी अजून ही सार्वजनिक ठिकाणी साऊंड सिस्टीम जोर जोरात लावून ध्वनीप्रदूषण केले त्यांच्यावर गुन्हा नोंदवणार असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले.