२५ वर्षानंतरही गुरुजींना भेटण्यासाठी गावकऱ्यांचा महासागर लोटला

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
येथील प्राथमिक शिक्षक उत्तम कोळी यांनी 25 वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील बेनिक्रे येथे शिक्षण सेवा केली होती.त्यांनी या शाळेत धावती भेट दिली असता आपले गुरुजी आले म्हणून त्यांना भेटण्यासाठी गावातील जनसागर लोटला होता.यामुळे बजावलेल्या शिक्षण सेवेचे सार्थक झालं अशी प्रतिक्रिया उत्तम कोळी यांनी दिली.उत्तम कोळी यांची शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात जीवन शिक्षण विद्या मंदिर बेनिक्रे (ता कागल) येथे दि. ३१ डिसेंबर १९९३ पासून झाली.तेंव्हा पासून ते १२ जून २००६ अखेर म्हणजे तब्बल १२ वर्षे ६ महिने त्या गावात इमाने इतबारे अगदी प्रामाणिकपणे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम केले.त्यावेळी शाळेच्या किल्ल्या कोळी यांच्याकडेच असायच्या,शाळा २४ तास उघडी असायची,विद्यार्थी दिवसभर शाळेतच असायची व रात्रीच्या अभ्यासला व कोळी यांच्या सोबतीला रात्रभर शाळेतच असायची, २४ तास उघडी असणारी त्या काळातील १ ली ते ७ वी ची जिल्ह्यातील पहिली शाळा होती.तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका शब्दावर बेनिक्रे शाळेस पहिला संगणक स्वतः आणून जोडला होता.पाणी नसतांनाही सर्वांच्या सहकार्याने शाळेसमोर अर्धा एकराची बाग तयार केली.कोळी स्वतः आणि विद्यार्थी जावून आडातून पाणी काढून कावडीने पाणी घालून बाग फुलवले.शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने यश मिळवले कोळी पती-पत्नी हे दोघेही या शाळेत नोकरीस होते . शिक्षण सेवा दरम्यान कोळी दापत्यांना गाववाल्यांनी खूप प्रेम दिले.कोळी यांनी शिकवलेले २३ विद्यार्थी सैनिक आहेत. कर्नल आहेत.त्यांचा व्यायम कोळी हे घ्यायचे, ७ विद्यार्थी इंजिनिअर, 2 विधार्थी डॉक्टर,काही शिक्षक,काही कंपनीत नोकरीस,काही शेती व इतर व्यवसाय करतात.गावात पहिला सार्वजनिक गणपतीची स्थापना कोळी यांनी करून महाप्रसादाचीही सुरुवात केली.कोळी यांचा एक विद्यार्थी भारतीय सैन्य दलात होता. त्याचे नाव संदिप इंगळे त्याला विरमरण आले. त्याचेच नाव शहिद संदिप युवा ग्रुप असे दिले. आजहीही ती परंपरा टिकून आहे.उत्तम कोळी यांनी नुकतीच त्या शाळेला भेट दिली एका तासाच्या भेटीत कोळी यांना गावकर्‍यांनी व विद्यार्यांनी पूर्वीचेच प्रेम दिले.आपूलकी दिली . त्याचा सत्कार केला त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.गावकरी व विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून कोळी यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले
निस्वार्थीपणे शिक्षक म्हणून काम करत असताना आपल्या हातून सुसंस्कृत पिढी घडवण्याचा प्रयत्न केला.यामुळे आजही मला गुरुजी म्हणून विद्यार्थ्यांनी जो सन्मान दिला. त्या सन्मानामुळे मी केलेल्या सेवेचे सार्थक झाले प्रत्येक ठिकाणी शाळेची प्रगती विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले शाळेसाठी झटत राहिलो. याचे मनस्वी समाधान वाटत असल्याचे कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
error: Content is protected !!