तुषार परशुराम ईळगेर यांची सांगली जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदी निवड

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे

नागज तालुका कवठेमहांकाळ येथील तुषार परशुराम ईळगेर यांची सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक पदी निवड झाली. सदर सरळ सेवा भरती परीक्षा 2024 जून मध्ये संपन्न झाली. यामध्ये तुषार ईळगेर यांनी 148 गुण मिळवत आपल्या नावावर शिक्कामोर्तब केला. यासाठी त्याला त्याचे शिक्षक व कुटुंबियांचे मोलाचे सहकार्य लाभले. आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना आपल्या कामांमध्ये कोणताही कसूर न ठेवता गोरगरीब जनतेचे आरोग्य विषयक जी कामे असतील ती अतिशय काळजीपूर्वक व योग्य वेळेत करून देण्याची योग्य ती दक्षता माझ्याकडून घेतली जाईल असे मत तुषार यांनी व्यक्त केले. तुषार ईळगेर यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्याचे समजता मित्रपरिवार व कुटुंबीयांच्या वतीने त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

error: Content is protected !!