कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे
बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मति विद्यालय तारदाळ येथे स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांचा तृतीय पुण्यस्मरण समारंभ संपन्न झाला. मुख्याध्यापक सी.जी तेरदाळे हे अध्यक्षस्थानी होते.पर्यवेक्षक पी.बी.शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यापक सुरज पाटील यांनी गुरुजींच्या कार्याची माहिती दिली.
ते म्हणाले बाहुबली संस्थेच्या योगदानामध्ये परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रेरणेतून त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.संस्थेचे माजी संचालक,माजी मुख्याध्यापक यासह अनेक पदे त्यांनी निस्वार्थी भावनेने भूषवली आहेत. चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून गुरुजींची ओळख आहे.त्यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा.
मुख्याध्यापक सी.जी.तेरदाळे म्हणाले गुरुजींचा स्वभाव अत्यंत काटकसरी व प्रामाणिक प्रशासनप्रिय होता.
बाहुबली विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांचे कार्य मौलिक व आदर्शवत आहे.ए.पी.चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक जितेंद्र आणुजे यांनी आभार मानले.यावेळी ज्येष्ठ अध्यापक व्ही.एम.खोत, व्ही.सी कुंभोजकर,एम.डी चौगुले आर.सी चौगुले,आर टी सुतार आदी उपस्थित होते.