टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या बाप्पाची आगमन मिरवणुक लक्षवेधी
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाने डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो बाल वारकऱ्यांची टाळ मृदुंग व हरिनामाचा गजराची दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून आयोजित करत वेगळी व पर्यावरण स्नेही आगमन मिरवणूक आयोजित करत परिसराचे लक्ष वेधून घेतले.खुपिरे ता.करवीर येथील वारकरी विद्यापीठ यांच्या शेकडो बालवारकऱ्यांनी या वेळी केलेला टाळ मृदंगाचा गजर व त्यावर धरलेला ठेका यामुळे संपूर्ण परिसरात एक अनोखे भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सर्वत्र एकच नादब्रम्ह निर्माण झाला होता.टाळ मृदुंगाच्या या आवाजातील सूर,लय,सोबतीला अधून मधून होणारा हरिनामाचा गजर यामुळे या मिरवणुकीला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती व गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले.डॉल्बीचे थरावर थर लावून कर्णकर्कश आवाजात मिरवणूक काढून आरोग्याच्या समस्या निर्माण करण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळांने छान पर्यावरण स्नेही उपक्रम राबविला असल्याबद्दल नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या.दरम्यान याच मिरवणुकीत मुलींवर होणारे अत्याचाराला वाचा फोडणारे किती दिवस मेणबत्ती जळायच्या, एकदा बलात्कारी जाळून बघा… परत कधी मेणबत्ती जाळण्याची गरज नाही” व “बच्ची थी मुझे तो छोडते” असे प्रभोदनात्मक मजकुराचे पोस्टर घेतलेल्या दोन छोट्या बालिका हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते.