सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी शिरोली पोलिसांचा रूट मार्च

Spread the love

सार्वजनिक गणेशोउत्सव ईद ए मिलाद सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी शिरोली पोलिसांनी केला रूट मार्च

आज पासून सुरू होणारा सार्वजनिक गणेश उत्सव,ईद ए मिलाद सन उत्सव शांततेत पार पाडण्याचे दृष्टीने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते दीड वाजण्याच्या सुमारास शिरोली नाका- मुख्य बाजारपेठ, छत्रपती संभाजी महाराज चौक,घोडेगिरी तालीम मंडळ माळवाडी,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,किस्मत नगर,रेणुका नगर,अशा मार्गे कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च काढण्यात आला.त्यानंतर सांगली फाटा,शिरोली पुलाची या ठिकाणी दंगल काबूची रंगीत तालीम घेण्यात आली.यावेळी सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी सण शांततेत पार पाडावेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.शिरोली एमआयडीसी व गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी,पोलिस अमलदार व पोलीस मुख्यालय कडील RCP अंमलदार हजर होते.सदरची रंगीत तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे.
error: Content is protected !!