पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून खून करणाऱ्या पतीचा पंचगंगा नदी पात्रात मृतदेह आढळून आला हि घटना नदीत गणपती सोडण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यानी शिरोली पोलिस ठाण्यात माहिती दिली.पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या सागर कोळवणकर व मनीषा कोळवणकर हे आपल्या मुलांसह राहत होते. सोमवारी रात्री एक वाजण्यासुमार सागर याने पत्नी मनीषा झोपेत असताना अज्ञात कारणावरून तिच्या डोक्यात हातोडा मारून गंभीररीत्या जखमी केले होते.तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता उपचारादर्म्यान बुधवारी रात्री मनीषाचे निधन झाले त्यानंतर शिरोली पोलिस ठाण्यात सागरवर खुनाचा दाखल करण्यात आला होता.सोमवारी रात्री मनीषाला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.त्यावेळी सागर याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले.त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक न करता 108 क्रमांकाची रुग्णवाहिकेतून त्यालाही रूग्णालयात पाठवले पण सागर हा पहाटेपर्यंत रूग्णालयात थांबला आणि तेथून तो पळ काढत बावडा मार्गे शिये पंचगंगा नदीच्या पुलावर आला आणि त्याने नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पहिल्याचे समजते त्यामुळे सागर याने आत्महत्या केली असावी असाही संशय व्यक्त होत होता.पण पोलिसानी नदी पात्रात शोध घेतला पण तो सापडला नसल्याने तो पत्नीस मारून बेपत्ता झाला असा पोलिसांचा अंदाज होता.पण आज गुरूवारी शिरोली येथील काही नागरीक वर्षाचा गणपती पाण्यात सोडण्यासाठी नदीकडे गेले असताना त्याना पाण्यावर पुरूषाचा मृतदेह तरंगत असताना दिसला त्यानुसार त्यानी शिरोली पोलिसाना याबाबत माहिती कळवताच पोलिसानी घटनास्थळी येवून मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याची ओळख पटवून हा मृतदेह सागर याचा असल्याची खात्री करून घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला होता अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता शिरोली पोलिसातून मिळाली. मानसिक संतुलन बिघडल्याने सागरने पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडा मारून तीचा खून करून नदीत उडी घेऊन स्वतःचे जिवन संपव.खरे पण दोन मुलाना आई वडीलांची साथ अर्धावर सोडून आई वडीलाविना पोरके करून गेले.