शिरोळमध्ये रोटरी क्लब, उषःकाल हॉस्पिटल आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

 

येथील रोटरी क्लब ऑफ शिरोळ व उषःकाल अभिनय मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी उपचार व सल्ला या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला अनेक रुग्णांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली

 

बाजारपेठेतील हरी मंदिर येथे रोटरी क्लब आणि उषःकाल हॉस्पिटलच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.युवा सामाजिक कार्यकर्ते विराजसिंह जगदाळे ह भ प सुरेश पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात करण्यात आली.

 

उषःकाल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा कुरणे यांनी आरोग्य तपासणी दरम्यान रुग्णांना कोणत्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत याची माहिती दिली.रोटरी क्लब ऑफ शिरोळचे अध्यक्ष सुनील बागडी यांनी स्वागत केले.चिंतामणी गोंदकर यांनी प्रास्ताविक

 

 

केले सचिव डॉ अंगराज माने यांनी आभार मानले.
या आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांची साखर रक्तदाब हृदयासंदर्भातील ईसीजी यासह अन्य तपासणी करून औषधोपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी उषःकाल हॉस्पिटलचे वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले.

 

 

यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोळचे ट्रेझरर दिनेश माने-गावडे,सदस्य अविनाश टारे, नितीन शेट्टी, पंडित काळे, प्रतापसिंह देसाई, बापूसाहेब गंगधर, बाळासाहेब शेट्टी, श्रीकांत शिरगुप्पे, सचिन देशमुख, अमित पोतदार, संदीप बावचे,धनाजी पाटील- नरदेकर, कृष्णा भाट, बाळासाहेब कोळी, शामराव पाटील, हरिश्चंद्र संकपाळ, महादेव जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!