पहिल्या महिला दहीहंडीचे मुंबईचे शिवशक्ती महिला गोविंदा पथक मानकरी
शिरोळ / प्रतिनिधी
युवानेते पृथ्वीराजसिंह यादfव यांच्या नेतृत्वाखाली यादव प्रेमी युवा मंच आयोजित शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी शिरोळच्या जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने फोडून 1,11,777 रुपये रोख रक्कम 5 फुटी कायम चषक पटकाविले पहिली महिला दहीहंडी मुंबईच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने फोडून 51,777 रुपये रोख रक्कम व कायम चषक मिळवला मान्यवरांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकांना पारितोषिक देण्यात आले.
युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वात यावर्षीही यादव प्रेमी युवा मंचच्यावतीने शिरोळातील दहीहंडी सोहळ्याचे जनक स्व.शिवाजीराव यादव व माजी आमदार दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवारी सायंकाळी शिरोळातील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे नेटके आयोजन केले होते.
अद्यावत डी जे साऊंड सिस्टिम लेसर शो नेत्रदीपक विद्युत रोषणाई आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आणि मुंबई येथील डान्स ग्रुपच्या नुताविष्काराने चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी संयोजकांच्यावतीने महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
यामुळे परिसरातील महिला मोठ्या संख्येने हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या या सोहळ्या दरम्यान युवानेते पृथ्वीराजसिह यादव यांनी आजवर केलेल्या विविध क्षेत्रातील कामाची चित्रफीत स्क्रीनवर प्रसारित करण्यात आली.
अशा चैतन्यदायी वातावरणात हलगी व घुमक्याच्या कडकडात तरुणांनी युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांना खांद्यावर घेऊन मोठ्या जल्लोषात व्यासपीठापर्यंत आणले यानंतर या दहीहंडी सोहळ्याची सुरुवात झाली.
सुरुवातीला जयसिंगपूरमधील महिला भजनी मंडळाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पाळणा गायिला यानंतर महिला दहीहंडी सोहळ्यास सुरुवात झाली.
ही दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई येथील शिवशक्ती महिला गोविंदा पथक आणि स्वाभिमानी प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक सहभागी झाले होते.दोन्ही गोविंदा पथकाने सलामी दिल्यानंतर चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली.या महिला दहीहंडी सोहळ्याचे प्रेक्षकांना खास आकर्षण ठरले सहा थर रचत शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडून 51 हजार 777 रुपये रोख रक्कम व कायम चषक असे पारितोषिक पटकाविले.
पुरुष दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळ मधील 6 गोविंदा पथकानी सहभाग घेतला होता.जय हनुमान मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, श्री बुवाफन मंडळ, श्री जय भवानी मंडळ, गोडी विहीर (एस पी बॉईज) , विजयसिंह नगर मंडळाच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.प्रत्येक प्रत्येक गोविंदा पथकाने
सलामी दिल्यानंतर उंचावरील दहीहंडीचे अंतर कमी करत चिठ्ठ्या टाकून दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली.यामध्ये जय हनुमान मंडळाच्या गोविंदा पथकाने चपळाईने व चित्तथरारक सहा मानवी मनोरे रचत शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठी यादव प्रेमी युवा मंचची दहीहंडी फोडून 1,11,777 रुपये रोख रक्कम आणि 5 फुटी कायम चषक असे पारितोषिक पटकाविले.
दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थित सर्वच प्रेक्षकांनी डी जेच्या तालावर ठेका धरून दोन्ही संघाचे अभिनंदन केले.
यावेळी गोडी विहीर तालीम व एस पी बॉईज या गोविंदा पथकाने सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता.या दहीहंडी सोहळ्यानिमित्ताने मुंबई डान्स शो मधील कलाकारांनी बहारदार हिंदी मराठी गीतांवर आपला नृत्य आविष्कार सादर करत उपस्थितांची मन जिंकली.
अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई ,माजी सभापती सौ कविता चौगुले,शिरोळचे पालिकेचे प्रशासक निशिकांत प्रचंडराव, माजी सरपंच गजानन संकपाळ, माजी नगरसेवक पंडित काळे, विजय आरगे,बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण,धनाजी पाटील-नरदेकर,संभाजीराव यादव,
संजयसिंह यादव, जब्बार मेस्त्री, पोलीस उपनिरीक्षक राऊत,पोलीस उपनिरीक्षक मुल्ला,सौ उज्वला पाटील, सौ जोत्स्ना यादव, नगरसेविका सौ अनिता संकपाळ, सुनिता आरगे, गायत्री मुळीक,वंदना पाटील, योगिता कांबळे, दिपाली फल्ले, सुनीता माने यांच्यासह शिरोळ
तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अनेक शहरातील नगरसेवक व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादव प्रेमी दहीहंडी महोत्सवाचे संयोजक भालचंद्र ठोंबरे यादव प्रेमी युवा मंचचे अध्यक्ष अजित देशमुख यांच्यासह यादव प्रेमी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
जिल्ह्यात उच्चांकी गर्दी
युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वात यादव प्रेमी युवा मंच आयोजित दहीहंडी महोत्सव 2024 मोठ्या दिमाखात पार पडला. प्रथमच तालुक्यातील महिला दहीहंडी सोहळा व शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी येथील पद्माराजे विद्यालयाचे क्रीडांगण प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरले होते. क्रीडांगणाच्या बाहेर रस्त्यावर राहून प्रेक्षकांनी दहीहंडीचा आनंद लुटला या निमित्ताने तालुक्यात नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात गर्दीचा उच्चांक मोडणारा दहीहंडी सोहळा पार पडला.