राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रज्ञा माळकर प्रथम

Spread the love

 शिरोळ / प्रतिनिधी

 

शिरोळ येथील कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने रयत शिक्षण संस्थेच्या श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालय सावळज जिल्हा सांगली यांचे वतीने स्व. आर.आर.आबा पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

 

तिला रोख रू.७००१/- स्व. आर.आर . आबा पाटील चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कु. प्रज्ञा ही सध्या श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली या ठिकाणी पदवीच्या अंतिम वर्षात शिकत आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रातील सांगली , सातारा, सोलापूर, कोल्हापूर ,नगर, पुणे अशा विविध ठिकाणच्या बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

 

 

या स्पर्धेत कु. प्रज्ञा माळकर हिने ” शाहू, फुले यांचे कृतिशील वारसदार डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. या यशामध्ये तिला महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!