डी मार्ट जवळ एसटीच्या धडकेत झालेल्या अपघातात वृद्ध जागीच ठार

Spread the love
सांगली-कोल्हापूर महामार्गावर डी मार्ट जवळ एसटीच्या धडकेत झालेल्या अपघातात शंकर सखाराम बंडगर (वय ६५ रा.उदगाव) हे वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.याबाबतची रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेले माहिती अशी,  शंकर बंडगर हे घरी सायकलवरून जात होते. यावेळी जुन्या बिल्चिंग कारखाना जवळ आल्यानंतर सांगली आगाराची सांगली-इचलकरंजी ही एसटी बस जात होती.
यावेळी एसटीच्या आडवे अन्य वाहन आल्याने रस्त्याच्या कडेने सायकलवरून जात असलेले बंडगर याना एसटीची धडक होऊन एसटीच्या मागील चाक बंडगर यांच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे सांगली कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस वाहतूक सुरळीत करीत होते.
error: Content is protected !!