यादव प्रेमी युवा मंचच्यावतीने सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन

Spread the love

दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास १,११,७७७ रुपयाचे,महिला गोविंदा पथकास ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

शिरोळ / प्रतिनिधी 
येथील यादव प्रेमी युवा मंचच्यावतीने शिरोळातील दहीहंडी सोहळ्याचे जनक स्व.शिवाजीराव यादव यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास १,११,७७७ रुपये रोख रक्कम आणि पाच फुटी कायम चषक तर महिला गोविंदा पथकास ५१ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे अशी माहिती यादव प्रेमी दहीहंडी महोत्सवाचे संयोजक भालचंद्र ठोंबरे यादव प्रेमी युवा मंचचे अध्यक्ष अजित देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना ठोंबरे व देशमुख म्हणाले की युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली यादव प्रेमी युवा मंचच्यावतीने गोकुळाष्टमीनिमित्त प्रत्येक वर्षी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते.यावर्षी शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिरोळच्या पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर दहीहंडी महोत्सव होणार आहे.या दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा या ठिकाणी होणार आहे.दहीहंडी फोडणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास १ लाख ११ हजार ७७७ रुपये रोख रक्कम पाच फुटी कायम चषक दिला जाणार आहे.तर शिरोळ तालुक्यात प्रथमच महिला दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी महिला गोविंदा पथकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
ही दहीहंडी फोडणाऱ्या महिला गोविंदा पथकास ५१ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे.या दहीहंडी सोहळ्यासाठी अद्यावत साऊंड सिस्टिम लेसर शो, नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसेच मुंबईतील कलाकारांचा डान्स शो आयोजित करण्यात आला आहे.दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी तयार करून बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.या दहीहंडी सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि रंग माझा वेगळा मराठी मालिकेतील व अल्याड पल्याड चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का पिपूंटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यादव प्रेमी युवा मंचच्यावतीने प्रत्येक वर्षी शिरोळ तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा थाटात साजरा करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो
यावर्षीही अशाच पद्धतीने नेटका दहीहंडी सोहळा होणार आहे.हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता शिरोळमधील पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेवटी भालचंद्र ठोंबरे व अजित देशमुख यांनी केले आहे.या पत्रकार बैठकीस राहुल यादव, सिताराम शिंदे या प्रमुखासह यादव प्रेमी युवा मंचचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
—- चौकट —-
प्रथमच महिलांचा दहीहंडी सोहळा
यादव प्रेमी युवा मंचच्या वतीने शिरोळ तालुक्यात प्रथमच महिला गोविंदा पथकांना निमंत्रित करून महिला दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.याकरिता अनेक शहरातील महिला गोविंदा पथक येणार आहेत.तसेच परिसरातील महिलांना तालुक्यातील सर्वात मोठा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी पद्माराजे विद्यालयाच्या क्रीडांगणावर स्वतंत्र गॅलरी निर्माण करून त्यांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.यामुळे परिसरातील महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास भालचंद्र ठोंबरे यांनी बोलताना व्यक्त केला.
error: Content is protected !!