ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मधील बालगोपाळांनी दहीहंडीचा मनमुराद लुटला आनंदम ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा,दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर अशा उत्साहाच्या वातावरणात ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला…’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. स्कूलमध्ये बांधण्यात आलेली दहीहंडी दोन थर लावत दहीहंडी बासरीच्या मदतीने फोडताच स्कूल मधील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. याप्रसंगी स्कूलचे चेअरमन संतोष बाटे यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाचे पूजन करण्यात आले.
ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला.तर नंतर दहीहंडीचा प्रसाद वाटून दहीहंडी उत्सवाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमात नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यां सहभागी झाले होते .याप्रसंगी शाळेचे चेअरमन संतोष बाटे, प्रिन्सिपल सौ.मनीषा बाटे या कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी व्हाईस प्रिन्सिपल प्रतीक्षा पाटील आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.