शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर क्रमांक ३ या शाळेमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते चिमुकल्यानी चित्तथरारक मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली.
शिक्षणाची दहीहंडी असा उपक्रम शाळेत राबवत असताना यामध्ये सामान्य ज्ञानावर तसेच अभ्यासावर आधारित प्रश्न असलेल्या चिठ्ठ्या हंडीमध्ये टाकून ती हंडी उंचावर बांधण्यात आली व विद्यार्थ्यांच्याकडून मानवी मनोरे रचून हंडी फोडण्यात आली.हंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्ग इयत्तानिहाय प्रश्न विचारण्यात आले तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.या शाळेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड, शिक्षक सौ शशिकला पाटील, सौ सुरेखा येळगुडे, सौ सविता जाधव,जयश्री पेटकर,यशवंत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी आणि सर्व सदस्यांचे सहकार्य लाभते.