दत्त उद्योग समूहातर्फे खेळाडू अफरार पटेल यांचा सत्कार

Spread the love

शिरोळ : प्रतिनिधी

राज्यस्तरीय थांग – ता स्पर्धेत अजिंक्यपद मिळविल्याबद्दल तमदलगे ( ता शिरोळ ) येथील राष्ट्रीय विद्यालयाचे आदर्श खेळाडू अफरार झाहूर पटेल यांचा सत्कार शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला.येथील कारखाना कार्यस्थळावर दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्या हस्ते अफरार यांना पुष्पगुच्छ देऊन उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय थांग – ता स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील , सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने, राजेंद्र प्रधान , झाहूर पटेल , असमा पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, खेळात जिद्द , चिकाटी आणि सातत्याने सराव महत्त्वाचा असतो. अफरार पटेल यांनी खेळातील कौशल्य दाखविण्यासाठी मेहनत घ्यावी या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू असे सांगून त्यांनी आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

दरम्यान अफरार पटेल याला खेळासाठी क्रीडा प्रशिक्षक दीपक सुतार,एस एम कुंभार,सुनीता साळुंखे,मनोहर पवार यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक अविनाश पाटील, शिक्षक व आई-वडिलांचे त्याला प्रोत्साहन लाभले.

error: Content is protected !!