राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पटकावले विजेतेपद
शिरोळ : प्रतिनिधी
डॉ.घाळी कॉलेज गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत येथील शिवम संजय माळकर याने प्रथम क्रमांक पटकावून २०२४ च्या डॉ. घाळी करंडकचा मानकरी ठरला. सध्या शिवम भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगली येथे एम .बी.ए.च्या प्रथम वर्षात शिकत आहे.२०२२ साली याच स्पर्धेत शिवमची बहीण कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने उपविजेतेपद पटकावले होते.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सांगली,सातारा, कोल्हापूर, परभणी , सोलापूर, पुणे ,अहमदनगर, मुंबई अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत शिवमने ” द्रष्टा राजा – लोकराजा राजर्षी शाहू महाराज ” या विषयावर आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले.त्याला रोख रू. ७००१/- डॉ. घाळी चषक व प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ , संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, स्पर्धा विभाग प्रमुख प्रा. महेश कदम , बहुसंख्येने उपस्थित असलेले प्राध्यापक , विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी शिवमला भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगलीच्या संचालिका डॉ.पल्लवी जामसंडेकर व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.