धरणगुत्ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा उतरविला विमा
शिरोळ / प्रतिनिधी
जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटीमार्फत ग्रामपंचायत धरणगुत्तीमधील 14 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दहा लाखांचा पोस्टल एक्सीडेंटल इन्शुरन्स उतरवण्यात आला.या ग्रुप कडून ग्राहक कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रुपचे सदस्य शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमाकरिता ग्रुपचे संस्थापक सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.या उपक्रमाकरिता ग्रामपंचायत धरणगूत्तीतर्फे जयसिंगपूर गोल्ड सिटीचे कौतुक करण्यात आले.
अशा प्रकारचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्याचा हा अभिनव उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील,मनोहर माळी,सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी,ग्रुपचे सचिव सचिन लोहार, प्रा. सिताराम चव्हाण, एकनाथ मगदूम,शंकर देसाई,अरविंद मोघे , ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विमा उतरविण्याकरता ग्रुपचे अध्यक्ष चैतन्य राजोबा, सदस्य श्रीराम कुलकर्णी, उदय घाटे, सुधीर उर्फ भैय्या कुलकर्णी, अशोक गुंडे, एकनाथ मगदूम,ओंकार कुलकर्णी, चंद्रकांत बोरगांवे,अरविंद मोघे. यांचे सहकार्य लाभले.