पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिये येथील रामनगर परिसरात राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीचा खून करणाऱ्या नराधम मामास कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .
शिये ता. करवीर येथील रामनगर परिसरातून १० वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती १० वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती शिरोली पोलिसाना मिळताच त्यानी बुधवारी रात्रभर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला पण ती मिळाली नाही पण गुरुवारी सकाळी परत पोलिस यंत्रणा मुलीच्या शोध कार्यात पुढे येवून परिसरातील सर्व सी सी टीव्ही कॅमेरे तपासले पण कोणताच मार्ग दिसेना शेवटी पोलिसांनी श्वानास पाचारण करून मुलीच्या घरातील कंपड्याचा वास सुंगण्यास देताच श्वानाने योग्य दिशा दाखवून घटनास्थळी नेले . या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरा तपासले असता त्यात कंबरेपासूनचा भाग कॅमेरात कैद झाला होता त्या अनुषंगाने योग्य तपास करत काही संशयीताना ताब्यात घेतले यात मुलीच्या मामा दिनेशकुमार साह याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने तीला हरदासकी ओढ्याच्या कडेला निर्जन ठिकाणी नेवून तीच्यावर लैंगिक अत्याचार करून तीचा खून करण्यात आला असल्याची कबुली दिली आज दुपारी दिनेशकुमार साह याला कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने २८ ऑगस्ट पर्यंत ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली