परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ शिरोली व शिये गाव कडकडीत बंद

Spread the love

 

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील अत्याचार,
महाराष्ट्रात केलेला हिंदूंचा अपमान, कोल्हापुरातील
आंदोलनात हिरवे झेंडे नाचवत हिंदूंना केलेली शिवीगाळ या घटनांच्या निषेधार्थ व शिये येथील 10 वर्षीय परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ शिरोली , शिये गाव कडकडीत बंद करून निषेध व्यक्त केला.

 

परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व खुनाच्या निषेधार्थ आज शुक्रवारी शिये ( ता . करवीर )गाव बंद ठेवण्यात आले. यावेळी झालेल्या निषेध सभेत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.दरम्यान खासदार शाहू महाराज, माजी अमदार अमल महाडिक यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.

 

गुरूवारी परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी बिहारहुन कुटुंब हे गेले तिन वर्ष झाले येथे आले आहे. या कुटुंबाच्या नात्यातीलच व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पुलाची शिरोली येथील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत समोर जमून या सर्व घटनांचा निषेध व्यक्त केला तर नंतर शिरोली फाटा ते छत्रपती संभाजी चौकापर्यंत मानवी साखळी करण्यात आली.यावेळी दोषींवर कडक कारवाई करावी व नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या निषेध सभेवेळी सरपंच प्रतिनिधी कृष्णात (पिटु) करपे उपसरपंच बाजीराव पाटील (आबा) मा. उपसरपंच अविनाश कोळी
मा. उपसरपंच सुरेश यादव मा. जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण सुभाष पाटील सर प्रलाद खवरे संतोष भाटे योगेश चव्हाण बाळासो पाटील ग्रामपंचायत चे सर्व सदस्य पदाधिकारी सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

सरपंच शितल कदम, बाजीराव पाटील, मनिषा शिसाळ, विलास जाधव,माणिक शिंदे,पांडुरंग पाटील, रणजीत कदम, चंद्रकांत जाधव,किरण चौगले, कुमार जाधव,मछिंद्र मगदुम आदी उपस्थित होते.तर यावेळी शिरोली पुलाची गाव ही बंद करण्यात आले होते.

error: Content is protected !!