आरटीओ कॅम्पचा महिलांनी लाभ घ्यावा – सौ शोमिका महाडिक

Spread the love

पुलाची शिरोली/प्रतिनिधी कुबेर हंकारे

आरटीओ कॅम्पचा भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शौमिका महाडिक यांनी केले.त्या पुलाची शिरोलीत नवीन सुरू करण्यात आलेल्या आरटीओ कॅम्प च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.सरपंच सौ.पद्मजा करपे,उपसरपंच,शिवसेना लालुका प्रमुख बाजीराव पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, मोटर वाहन निरीक्षक सागर भोसले,सौ.रचना जाधव ,सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सौ.स्वरूपा नांगरे पाटील,मौजे वडगाव सरपंच सौ.कस्तुरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

सौ.महाडिक पुढे म्हणाल्या शिरोली भागातील महिला मोटार वाहनाच्या परवान्यापासून लांब आहेत शिवलीतील त्यामुळे त्यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे याचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.शासनाच्या महसुलामध्ये शिरोलीतील नवीन कँम्पमुळे वाढ होण्यास चांगली मदत होणार आहे. तसेच वाहनाच्या बाबतीत प्रलंबित असलेली कामे तात्काळ मार्गी लागण्यास याचा भागातील वाहनधारकांना चांगला उपयोग होईल. असे मत व्यक्त करुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी केले.

 

पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, माजी सरपंच पंडित खवरे,धनाजी पाटील, प्रकाश कौंदाडे, तानाजी जाधव, अशोक सावंत, सतीश पाटील, एस.आर.कासोटे,शिवाजी पाटील,सलीम महात,बाळासो पाटील,अविनाश पाटील,शब्बीर देसाई,डॉ.सुभाष पाटील , योगेश खवरे,त्रिमूर्ती ट्रेनिंग सेंटरचे विलास पाटील,रेणुका माता ट्रेनिंग सेंटरचे सचिन माने, राजेश पाटील, माजी उपसरपंच उदय पाटील,दिपक यादव, रणजित कदम, पांडुरंग तावडे,तात्यासो पाटील,सागर कौंदाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

स्वागत व प्रास्ताविक कृष्णात करपे यांनी केले, सुत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.आभार सौ.पद्मजा करपे यांनी मानले.नियोजन बाळासो पाटील, पिंटू करपे, धनाजी पाटील, योगेश पाटील, सचिन माने, नितीन परमाज, तुकाराम कांबळे, हंबीरराव चौगुले आदींनी केले.

error: Content is protected !!